• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच्या विजयासाठी मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाईल? ही नवी शक्यता काय सांगतेय?

tdadmin by tdadmin
March 27, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, Featured
0
पहा व्हिडिओ : एक गावकरी मोदी सरकारच्या रथाला नडला… प्रकरण बरेच वाढलं, पण अधिकाऱ्यांना रथ गावातून परत माघारीच न्यावा लागला..!

ज्ञानेश्वर रायते, महान्यूज लाईव्ह

अनेक पक्षांमध्ये फोडाफोडी करूनही महायुतीची चाळण काही केल्या भरत नाही, मूळचे राष्ट्रवादी व शिवसेना अगदी क्षुल्लक करून ठेवले, तरी देखील महाराष्ट्राच्या मनात मात्र आताच्या घडीला महायुती पूर्वीसारखी जागा करून घेऊ शकत नाही. असे अनेक सर्वेक्षणे, अंतर्गत सर्वेक्षणे, खाजगी सर्वेक्षणे सांगू लागल्याने व स्थानिक पातळीवरील नेत्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे 2024 ची महाराष्ट्रातील निवडणूक भाजप आणि घटक पक्षाला जड जाईल या शक्यतेने दररोज नवनवीन समीकरणे जन्माला घातली जात आहेत.

गेल्या काही दिवसापासून वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन जाणार असल्याचे महाविकास आघाडी सांगत असली, तरी अजूनही महाविकास आघाडी आणि वंचितची भट्टी जमलेली नाही. किंबहुना ती जमण्याची शक्यता नसल्याच्या बातम्याच जास्त प्रमाणात झळकू लागल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा एक मोठा अपेक्षित असलेला व सरकारच्या विरोधात मतदान करू पाहत असलेला मतांचा गठ्ठा बाजूला जाईल आणि दुसरीकडे आरक्षणाच्या लढाईत सरकारच्या विरोधात गेलेली मराठा मते ध्रुवीकरण केल्यास महायुतीला ही निवडणूक सोपी जाईल असे आडाखे बांधले जात आहेत. त्यातून अनेक शक्यता तपासून दररोज नव्या नव्या गोष्टी जन्माला येत आहेत.

अशाच परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी सरकारचा विरोध या नावाखाली तसेच निवडणुका बॅलेट पेपरवर हव्यात ही भूमिका मांडून प्रत्येक मतदारसंघातून 1000 उमेदवार उभे करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याला तितकेसे यश येत नसल्याचे पाहून, आता प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार म्हणून उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात यामध्ये पूर्वीच्या महायुतीतीलच बंडखोर व जास्त प्रभाव असलेले नेते निवडले जात आहेत, हे आणखी एक विशेष! या माध्यमातून तिरंगी लढती प्रत्येक लोकसभा मतदारसंघात लढवून मराठा आरक्षणाच्या लढाईत जे मराठा महायुतीच्या विरोधात आहेत, त्यांच्या मताचे ध्रुवीकरण करण्याचा देखील एक आखणी करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.

नुकतेच पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. आता या उमेदवारीला मराठ्यांचे उमेदवार अशी एक कल्पना देण्याची मोहीम तेजतर्रार झाली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अशा प्रकारे उमेदवार उभे करून जो वाद मराठा विरुद्ध ओबीसी असा घडवता आला नाही व त्यातून जो परिणाम साधायचा होता, तो परिणाम आता अगदी विनासायास या लोकसभा निवडणुकीत साधता येईल. थेट मराठा मतांचेच ध्रुवीकरण करून हा परिणाम साध्य करता येऊ शकतो, अशा स्वरूपाची आखणी यामध्ये झाली आहे.

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे अथवा वंचित बहुजन आघाडी व मराठा उमेदवार एकत्र लढल्यास महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी व मराठा उमेदवार अशा लढतींचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जे सरकार विरोधातील वातावरण आचारसंहिता सुरू होईपर्यंत होते, ते वातावरण शेवटपर्यंत कायम टिकवण्यात महाविकास आघाडीला यश येईलच असे सांगता येणार नाही.

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष आहे. हे मतदान महाविकास आघाडीकडे जाण्याची अधिक शक्यता आहे, अशा परिस्थितीत या मताला वेगळी वाट करून दिली, तर महायुतीचा एक मोठा अडसर दूर होऊ शकतो, हे माहित असलेल्या धुरिणांनी वेगवेगळ्या चाणक्यांमार्फत नव्याने मोहीम आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या एकमेकांच्या उमेदवारांच्या यादीवर लक्ष ठेवून असलेल्या महाविकास आघाडी व महायुतीतील दोन्ही पक्ष बाजूला ठेवून नवी समीकरणे जन्माला घालण्याची व महाराष्ट्रात पुन्हा 2019 प्रमाणेच मोदींचे कमळ फुलवण्याची एक नवी मोहिम अचानक सुरू झाली आहे.

Next Post
कौतुकास्पद! 20 व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत 13 सुवर्ण, 33 रौप्य,30 कांस्य पदकासह महाराष्ट्र संघास उपविजेतेपद!

कौतुकास्पद! 20 व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत 13 सुवर्ण, 33 रौप्य,30 कांस्य पदकासह महाराष्ट्र संघास उपविजेतेपद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group