• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्हाला माहिती आहे का? आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन.. आता निसटून चाललंय, अन् आपल्या ते लक्षातही येत नाहीये.!

tdadmin by tdadmin
March 23, 2024
in सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
तुम्हाला माहिती आहे का? आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन.. आता निसटून चाललंय, अन् आपल्या ते लक्षातही येत नाहीये.!

नेहा किल्लेदार, पुणे

परवा एका मित्राशी पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रोडवर जो नो vehicle zone केला होता, याबाबत चर्चा करत होतो. एकूणच सगळी मुलं मोठी माणसं सगळेच कसे enjoy करत होते, हे तो सांगत होता आणि मध्येच म्हणाला की, तुला माहितीये का, त्या LIC च्या बिल्डींगच्या इथे तो एक जुना बोर्ड आहे आणि खूप जुना आहे.

आपण एवढ्या वेळा जातो त्या रस्त्यावरून मला पुण्यात येऊन ६/७ वर्ष झाली, पण मी तो आज पाहिला. मला कळलं नाही की, हा असं का सांगतोय? बोर्ड आहे जुना, तो पहिला त्यात काय ते एवढं? तर तो म्हणाला की, मी आज battery low असल्याने माझा फोन घरी charging ला लावून मग बाहेर पडलो. आणि या बोर्डसारख्या अजूनही काही गोष्टी मला जाणवल्या. कारण इतके दिवस आधी मी कधी त्या इतक्या clearly पाहिल्याच नव्हत्या.

फोन नसल्याने माझं लक्ष गेलं आणि मी ते notice करू शकलो. त्याच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की, आपण फोनमध्ये इतके अडकून गेलोय की, निरीक्षण हा घटकच नाहीसा झाला आहे.  त्यामुळे आपण सारखं स्वतःला मी किती busy आहे हे सांगत राहतो. नाही हो वेळच होत नाही इतकं सुरू असतं ना, दिवसभर काय काय. काय सांगू तुम्हाला? पण खरंच असं असतं का?

अगदी दोन मिनिटं सुद्धा रिकामी मिळत नाहीत का? आणि जेव्हा मिळतात त्यात आपण काय करतो? बऱ्याचदा फोन हातात घेऊन social networking sites, games, photos, videos, कधी कधी तर अगदी नुसतं wallpaper बघत असतो. पण पूर्वी म्हणजे साधारण १५-२० वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. त्याकाळी हा फोन नव्हता. तेव्हा लोक काय करत असतील? त्याकाळी लोकांकडे वेळही असायचा हे वाक्य तर आपण इतक्या वेळा ऐकतो.

पण तो दोन गोष्टींच्या मधला वेळ त्यांना कसा मिळायचा? तर हा मधला वेळ म्हणजे बस स्टॉप वर उभा असताना बस येईपर्यंतचा, Hotel मध्ये order येईपर्यंतचा, भेटीच्या ठिकाणी समोरचा माणूस येईपर्यंतचा, भात शिजेपर्यंतचा, कॉलेजात शिक्षक येईपर्यंतचा, टीव्हीवर एखादा Program संपुन दुसरा सुरू होईपर्यंतचा किंवा डॉक्टरांच्या waiting room मध्ये आपल्या नंबराची वाट बघेपर्यंतचा वगैरे वगैरे…. हा जो काही मधला वेळ आपल्याला मिळायचा त्यात आपण फोन नसताना काय करायचो??

खूप विचारांती माझ्या असं लक्षात आलं की, साधारण आपण दिवसभरात जी कामं करणार असू त्याचा विचार, घरात कोण काय बोललं, त्यावरून कोणाला काय हवंय याचा विचार, मध्येच एखाद्या जुन्या मित्राची किंवा मैत्रिणीची आठवण येऊन तिचं काय चाललं असेल ती ख्यालीखुशाली पत्र लिहून विचारली पाहिजे

अशी एक आठवण, आपल्या हातून एखादी चूक घडली असेल तर कारणमीमांसा करून चूक सुधारण्यासाठी process, अर्थिक गणिताची जुळवाजुळव, घरगुती कार्यक्रमाचे नियोजन, वर्तमानपत्र, मासिक वाचणं/चाळणं, गॅलरीत उभं राहून झाडं पक्षी बघणं, आजूबाजूला असणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं, त्यांचा पेहराव, सामान, गाड्यांचं निरीक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वसंवाद…. म्हणजे या सगळ्या आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांवर आपल्या मनात उमटणारे प्रतिसाद…..अशा असंख्य गोष्टी मुकेपणाने त्या एकट्याच्या मधल्या वेळेत चालत असायच्या..

पण आज Online, Quick, Instant या सगळ्याच्या नादात आपण हा मधला वेळ हरवून बसलोय का ? म्हणजे आवडतात म्हणून आणि इच्छा झाली म्हणून आपण गाणी ऐकतो की सवय म्हणून पटकन headphones लावून गाणी आपोआप चालू केली जातात ? गरज आहे म्हणून आपण मोबाईल बाहेर काढतो की आपोआप तो बाहेर येतोच आणि आपसूक सवयीने FB, Insta check केलं जातं ?

काहीच नवीन नसेल तर हा Group open कर, त्याचं Profile check, हा इकडे गेला होता, बरंय यांना बऱ्या मिळतात रजा फिरायला वगैरे विचार करत राहतो… आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचा प्रश्न असा की त्यातून आपल्याला काय मिळतं??? लोकांचे प्रोफाईल check करणं, तासनतास reels बघत बसणं, नुसतं उभं राहिलं की फोन काढून unlock करून messages, phones आले आहेत का चेक करणं!

यातून आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन, मात्र निसटून चाललंय आणि आपल्या ते लक्षातही येत नाहीये. त्यामुळे उघडा डोळे बघा नीट. कामाच्या मधल्या 5/10 मिनिटात फोन न बघण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करा. एखाद्या collegue ला compliment द्या. उगाचच signal वर थांबलेल्या गाडीवरच्या माणसांकडे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेळ नाहीये. वेळ नाहीये हे स्वतःला आणि इतरांना ऐकवण्याआधी कटाक्षाने मी माझा मधला वेळ किती आणि कुठे घालवतोय हे पहा. मग वेळ कधी कुठे कसा जातोय.. याचा प्रश्न पडणार नाही….

नेहा किल्लेदार, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
M.A. Clinical Psychology,
PG Diploma in Clinical and counseling Psychology. Mindflow Mental Health Cares, Pune. ९४०५२६२०६६

Next Post
तुम्हाला माहिती आहे का? आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन.. आता निसटून चाललंय, अन् आपल्या ते लक्षातही येत नाहीये.!

सख्खा भाऊ वैरी का बनला असेल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group