बॉयफ्रेंडसाठी सोळा वर्षाची मुलगी बाप आणि भावाचा काळ बनली! दोघांनी बाप किचनमध्ये आणि भावाचा खून केला! मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून दोघे पुण्यात फिरतायत!
सोळावं वरीस धोक्याचं ही म्हण आपल्याकडे पूर्वीपासूनच प्रचलित आहे, पण हे धोक्याचं वय फक्त प्रेमासाठी नाही, तर जन्मदात्या बापाचा आणि भावाचा जीव घेण्यासाठीही धोक्याचं ठरलं आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथील डबल मर्डर मिस्टरी सध्या देशात चर्चेत आहे अवघ्या सोळा वर्षाच्या मुलीने बॉयफ्रेंड साठी धाकट्या भावाला आणि बापाला संपवलं आणि प्रियकरा सोबत पळ काढून ती आता पुण्यात फिरतेय. पोलीस गेल्या दोन दिवसापासून मागावं आहेत पोलिसांना तिचं लोकेशन पुण्यात सापडलं आता पुण्यामध्ये मध्यप्रदेश पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत.
रेल्वेत ऑफिस सुपरिटेंडेंट असलेले राजकुमार विश्वकर्मा यांचा खून झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाचाही खून झाला आहे. हा खून मुकुल सिंह नावाच्या तरुणाने केला असून, हा खून करण्यासाठी मुकुलसिंह आणि विश्वकर्मा यांची सोळा वर्षाची मुलगी दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता, असे पोलीसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी पत्नीला हृदयविकाराचा झटका येऊन पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर 16 वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासह राजकुमार विश्वकर्मा एकटेच राहत होते. एक वर्षात ते स्वयंपाक करण्यासही शिकले होते. पण मुलीनेच जन्मदात्या बापाचा आणि लाडक्या भावाचा खून करण्याचा प्लॅन आखल्याने मध्य प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. मुली पळून जातात हे आजवरचे खरे वास्तव असले तरी मुली काळ बनून येतात, हे मात्र अतिशय धक्कादायक आहे.
गल्लीतल्या रीलस्टारच्या प्रेमात पडली मुलगी!
मुलीचे लग्न करायचे असल्यास मुलीच्या घरचे नवरा मुलगा शोधण्याकरता त्याची नोकरी, त्याची शेती, त्याची संपत्ती हे सारे पाहतात; पण प्रेमाच्या भावनेत पळून जाताना मुलींना रस्त्यावरचे भंगारछाप रोडरोमिओ देखील चालतात, तसाच काहीच प्रकार यादेखील मर्डर मिस्टरीमध्ये असून राजकुमार विश्वकर्मा राहायचे. त्याच गल्लीत राहणारा मुकुलसिंह या मुलीला आवडू लागला.
हा मुकुलसिंह जिममध्ये जायचा आणि करण्यासाठी सोशल मीडियावर रिल्स करायचा. बस्स.. तिच्यासाठी प्रेम करायला एवढे कारण पुरेसे होते. मात्र या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच राजकुमार विश्वकर्मा यांनी मुलीची कानउघाडणी केली आणि मुलगी देखील या भयंकर प्रकरणात सहभागी झाली.
चार दिवसांपूर्वी शुक्रवारी सकाळी राजकुमार विश्वकर्मा हे घरात दोन्ही मुलांसाठी शाळेकरता जेवणाचा डबा बनवत असताना मुलीने आखलेल्या प्लॅननुसार मुकुलसिंह हा अचानक घरात शिरला आणि त्याने राजकुमार यांच्या डोक्यात अवजड वस्तू घातली. या घावात राजकुमार यांचा जीव गेला. त्यानंतर त्याने आठ वर्षाच्या चिमुकल्या मुलाचाही जीव घेतला.
दरम्यान मुलाला मारत असताना मुलीचा आवाज सोसायटीतील वॉचमनने ऐकला आणि वॉचमन घराकडे धावला. मात्र घरातून कोणताही रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे तो पुन्हा खाली गेला. दरम्यान दूधवाला घरात आला होता. त्याच्याकडील दूधही मुलीने घेतले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर बापाचा मृतदेह किचनमध्ये आणि मुलाचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून हे दोघेही घरातून पळून गेले.
राजकुमार यांचा भाऊ बाबूकुमार विश्वकर्मा यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार लागलीच पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी 11 वाजता दोघेही रेल्वे स्टेशनवर गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मध्य प्रदेशात विविध पोलीस ठाण्यांना अलर्ट केले, मात्र त्यानंतर दोघेही उत्तर प्रदेशात पळून गेल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी आग्रा, वाराणसी, अयोध्या, मथुरा या ठिकाणी देखील तपास केला. दरम्यानच्या काळात मुकुलसिंह याचे लोकेशन पोलिसांना समजत नव्हते, मात्र मुलीच्या मोबाईलवरून ती आता पुण्यात फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांची पथके सध्या पुण्यात दोघांच्या शोधात आहेत.











