इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बस स्थानकावर बस मध्ये चढण्याच्या मानसिकतेत प्रवाशा असतात. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे बस स्थानकावर सक्रिय असतात. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक 23 वर्षीय चोरटी महिला गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने लांबवायची. इंदापूरच्या पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने या महिलेला पकडले आणि तिच्याकडून तब्बल 235 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम असा अकरा लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
इंदापूरच्या बसस्थानकावर माळशिरस तालुक्यातील अलका बनकर या पुण्याकडे निघाल्या होत्या आणि बस मध्ये चढताना त्यांच्या बॅगेतील पर्स अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन लांबवली. त्यामध्ये बनकर यांचे 15 तोळे सोने व रोख रक्कम असा आठ लाख रुपयांचा ऐवज होता. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रक्कम मोठी असल्याने पोलिसांनी यावर गांभीर्याने लक्ष दिले आणि गुन्ह्याचा तपास करताना बस स्थानकाच्या परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी रेकॉर्डवरील सराईत महिला गुन्हेगार या घटनेच्या ठिकाणी दिसून आली आणि तिचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला पोलिसांनी सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे चौकशी केली तेव्हा खेड पोलीस ठाण्यातील तसेच इंदापूर पोलीस ठाण्यातील आणखी तीन गुन्हे उघड केस आले अश्विनी अवि भोसले वय 23 राहणार माहिजळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे या चोरट्या महिलेचे नाव आहे ही महिला सराईत गुन्हेगार असून तिच्यावर नगर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात मिळून पाच गुन्हे दाखल आहेत.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल ढेरे, विवेकानंद राळेभात, बाळासाहेब कारंडे, राजू मोमीन, निलेश शिंदे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधरी, प्रकाश माने, निलेश केमदारने, गणेश ढेरे, रेश्मा जगताप, वंदना भोंग यांच्या पथकाने ही कारवाई केली











