भिगवण : महान्यूज लाईव्ह
भिगवण नजिकच्या मदनवाडीतील आनंद हॉटेलवर पोलिसांनी आज छापा टाकला, यामध्ये हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी हॉटेल मालक नामदेव बाळासाहेब बंडगर याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर नामदेव बाळासो बंडगर याच्यासह गजानन लक्ष्मण ठाकूर, अमित तानाजी भाकरे, रोहित अंकुश निकम व मुंगाजी उर्फ पिंटू आवरगड या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती भिगवण पोलिसांनी दिली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवणनजिक बारामती रस्त्यावर हॉटेल आनंद येथे बेकायदा वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पुण्यातील परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षकांना व भिगवण पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला, तेव्हा तेथे तीन महिला आढळून आल्या. त्यांनी वरील पाच जणांनी आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली.
हि कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर, फौजदार रुपेश कदम, युवराज घोडके, दत्तू जाधव, रणजीत मुळीक, अंकुश माने, आप्पा दराडे, नारायण वाळके, डी. एल. इंगोले, डी. एस. जाधव, महिला पोलिसा अंमलदार सारिका जाधव, होमगार्ड पवार, देशमुख यांच्या पथकाने केली.











