बारामती, महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कन्नड येथील कारखान्याची जमीन व कारखाना जप्त केला, त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार हे सरकार विरोधात सातत्याने संघर्ष करत असून, सत्य आणि वास्तव जनजागृती करत आहेत, म्हणूनच सरकारकडून अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप केला.
बारामती सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या त्या म्हणाल्या राज्य शिखर बँकेच्या प्रकरणांमध्ये रोहित पवार यांचे कुठेही नाव नाही. मात्र केवळ रोहित पवार सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात बोलत आहेत म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. अर्थात भाजपने हे संविधान धोक्यात आणले आहे, आत्ताच नाही, अनेक विविध गोष्टीवरून हे सिद्ध होते असे देखील सुळे म्हणाल्या.
खुद्द संसदेत भारताच्या अर्थमंत्री अशोक चव्हाण बद्दल बोलताना म्हणाल्या की, लष्करातील जवानांच्या पैशावर देखील डल्ला मारला गेला आणि अशा स्वरूपाचा आरोप केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सहभागी झाले आणि आता ते राज्यसभेचे खासदार आहेत यावरून आपण काय बोध घ्यावा असे त्या म्हणाल्या.











