बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी बी ए (सी. ए.) विभागाच्या वतीने अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत बी.बी.ए. (सी. ए. ) या विभागातील ९६ विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विभागप्रमुख प्रा. महेश पवार यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच विभागाअंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी महाविद्यालयामार्फत जे जे विद्यार्थीपूर्वक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी व आपले भविष्य उज्जवल करण्यासठी त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक राहुल शाह यांनी अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या सर्व बाबी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितल्या. तसेच त्यांनी अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी विविध प्रोग्रामच्या मदतीने विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. भरत शिंदे, विभागप्रमुख प्रा. महेश पवार , राहुल शाह यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ लालासाहेब काशीद यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. अनिल काळोखे यांनी काम पहिले. विशाल शिंदे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, कांचन खिरे, सलमा शेख, वैशाली पेंढारकर व सतीश चौधर यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले.











