महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आतापर्यंत थंडीताप, खोकला, घशातील खवखव, चव न कळणे, तीव्र डोकेदुखी, थकवा ही कोरोनाची लक्षणे होती. नंतर जुलाब, स्नायूदुखी, थरथरणे ही लक्षणे आली, आता नवी लक्षणे जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहेत.
या नव्या लक्षणांमध्ये डोळे येणे, त्वचेवर लाल पुरळ उठणे, मळमळणे, नाक सतत वाहणे, अंगदुखी ही लक्षणे दिली आहेत. याखेरीज छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, छाती दुखणे, बोलण्याची क्रिया बंद होणे तसेच शरीराची हालचाल थांबणे ही देखील कोरोनाची नवी लक्षणे मानली जात आहेत. त्यामुळे नेहमीच्या किंवा आतापर्यंत माहिती असलेल्या लक्षणांव्यतिरिक्त ही नवी लक्षणे आढळून आली तर घाबरून न जाता कोरोनाची चाचणी करून घ्यावी, जेवढ्या लवकर कोरोनाची चाचणी करून कोरोना निश्चित होईल, तेवढ्या कमी कालावधीत तो रोखलाही जाऊ शकतो. त्यावर मात करता येते.











