महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोरोनाच्या रुग्णसंख्येने जगातील ३ कोटींचा टप्पा पार केला. जगात आजवर ९ लाख ५० हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या गडबडीत भारत कधी तिसऱ्या क्रमांकावर पोचला तेही कळले नाही. त्याला काय हुतंय म्हणणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने टाळ्या, थाळ्या वाजवत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोचला.
कोरोना सर्वाधिक अमेरिका, ब्राझील व भारतात वाढला. अमेरिकेत आजमितीस सर्वाधिक ६० लाख रुग्ण असून अमेरिकेत २ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात ५२ लाखांवर कोरोनाग्रस्त पोचले असून भारत अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. ब्राझीलमध्ये ४४ लाखांवर कोरोनाग्रस्त आहेत, मात्र ब्राझीलमध्ये भारतापेक्षा अधिक म्हणजे १ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक ११ लाख कोरोनाग्रस्त आहेत.
भारतात सामूहिक रोग प्रतिकार शक्ती अधिक आहे असे सांगितले जात होते, त्यामुळे कोरोना येथे फारसा तग धरू शकणार नाही असेही सांगितले जात होते. मात्र भारतातही कोरोना अधिक खोलवर पोचला आणि कोरोनाबळीही..! अर्थात कोरोनाने मृत्यू होण्यामागे येथील ढिसाळ, मागास आरोग्यसेवा कारणीभूत आहे.










