पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या जवळ परिसरात रोहन मिथिला या इमारतीनजीक तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरामध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलेंडरच्या या स्फोटामुळे पुणे हादरले. दरम्यान या स्फोटामुळे नजीकच्या मजुरांच्या वसाहतीमध्ये आग लागली. आज दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेने सगळीकडे भीतीचे वातावरण होते.
रोहन मिथिला या इमारतीला जीक मजुरांच्या तात्पुरत्या असलेल्या वसाहतीतील एका छोट्या घरात जवळपास 100 पेक्षा अधिक सिलेंडर ठेवण्यात आले होते. त्यातील दहा सिलेंडरचा हा स्फोट झाला आणि या स्फोटाने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण केले. दरम्यान या घटनेनंतर मजुरांच्या या वसाहतीमध्ये आग लागली आणि अनेक मजुरांची घरे यात जळून गेली. या घटनेमध्ये गृहपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले.
बुधवरी दुपारी ही घटना घडली. तात्पुरत्या बांधलेल्या या घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे एका पाठोपाठ दहा स्फोट झाले. आग लागल्याचे समजताच या वसाहतीतील महिला आणि मुले सुरक्षित स्थळी पोचवण्यात आली. या ठिकाणी अग्निशमन दलाने देखील लगेच धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली.











