दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई शहरातील बावधन नाका परिसरात गोंधळ घातल्याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही लोक शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याच्या प्रयत्नातून खोटे गुन्हे दाखल करून शहरातील वातावरण बिघडवू पाहत आहेत. त्याबद्दल आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांना साताऱ्यात वाईकर नागरिक व व्यापाऱ्यांनी या अपप्रवृत्तीच्या विरोधात निवेदन दिले.
शहर व तालुक्यातील वातावरण काही लोक बिघडवू पाहत आहेत. चुकीचे आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करू पाहत आहेत. समाजाला वेठीस धरू पहात आहेत. वाई पोलिसांवर दबाव आणू पहात आहेत, त्याच्या निषेधार्थ सोमवारी वाईकर नागरिकांच्या वतीने वाई उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा सोमवारी गणपती घाटावरून सकाळी १०.३० वाजता किसन वीर चौकमार्गे वाई पोलिस ठाणे आणि वाईच्या डीवायएसपी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चात व्यापारी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .











