पाटस ते बारामती रस्त्यावरील खड्यावर मुरूम टाकून केली डागडूजी
दौंड : महान्यूज लाईव्ह
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व पाटस ते बारामती रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती अजित पवार यांना दिल्यानतर पवारांनी सूचना दिल्या, पण परिस्थिती जैसे थे राहिल्याने पवार यांनी तंबी दिली, मग मात्र सार्वजिनक बांधकाम विभाग कामाला लागला आणि काही वेळातच संबंधित अधिकारी व ठेकेदार रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली.
पुणे सोलापूर महामार्ग पाटस ते बारामती हा रस्तावर मोठ मोठे खड्डे पडल्याने खड्डेमय झाला आहे. हे खडे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास वेळ नव्हता,मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या रस्त्यावरून प्रवास करीत असताना त्यांना या रस्त्याची दुरावस्था नजरेत दिसली आणि त्यानी तातडीने
सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून तंबी दिली आणि रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश दिले.
अजित पवार यांच्या तंबीनंतर सार्वजिनक बांधकाम विभागाने तातडीने कामाला लागले आणि काही वेळातच संबंधित अधिकारी व ठेकेदार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला लागले. सध्या पाटस ते बारामती रस्त्याची ठिकठिकाणी खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाली होती. प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवाश करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत महान्यूज लाईव्ह ने बातमी प्रसिध्द केली होती. पुणे सोलापूर हायवे वरील पाटस येथील बारामती फाटा ते वासुंदे फाटा (गुंजखिळा) हा महामार्ग खड्डेमय झाला असून प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या एका फोनवर अधिकारांना धारेवर धरल्यामुळे सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची पळापळ झाली आणि तात्पुरती स्वरूपात का होईना मलमपट्टी म्हणुन माती मुरुम टाकून खड्डे बुजवून घेण्यास सुरुवात केली आहे.











