बावडा : महान्यूज लाईव्ह
शाळांच्या सहली किती महागात पडत आहेत याची उदाहरणे आपल्यासमोर असतानाच व नुकतेच सिंधुदुर्ग येथील समुद्रात पाच जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच इंदापूर तालुक्यालाही हा फटका बसला. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शाळेच्या सहलीच्या बसला टेम्पोची धडक बसल्याने आज पहाटे एका शिक्षकाचा मृत्यू झाला, तर एक शिक्षक गंभीर जखमी होऊन काही विद्यार्थीही गंभीर जखमी झाले आहेत.
माळशिरस- अकलूज रोड वर वटपळी नजीक ही घटना घडली विशेष म्हणजे कोकणात सहलीसाठी गेलेले विद्यार्थी परतत असताना अगदी गावाजवळ हा अपघात झाल्याने सर्वांना धक्का बसला या शाळेच्या बसमध्ये बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी होते या बसला व टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला.
त्यात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला झाला. तर एक शिक्षक जखमी झाले. बाळकृष्ण हरिभाऊ काळे (रा. रेडणी ता. इंदापूर) असे अपघातात मरण पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात आज गुरुवारी पहाटे 6 च्या सुमारास घडला.
या अपघातामध्ये सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. शाळेची शैक्षणिक सहल मंगळवारी कोकण भेटीला गेली होती. तेथून सहल आठवणी विद्यार्थी व शिक्षक पद्धत होते यावेळी शाळेला मिळालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (क्र. एम.एच. 14 बी. टी. 4701) हा अपघात झाला.











