• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्या प्रतिष्ठानच्या CBSE शाळेत नक्की चाललय काय?

tdadmin by tdadmin
December 15, 2023
in सामाजिक, मनोरंजन, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
विद्या प्रतिष्ठानच्या CBSE शाळेत नक्की चाललय काय?

पंकज पाटणकर, बारामती. (75884 23113)

अहो खरंच काहीच समजायला मार्ग नाही. काय चाललंय इथे नेमके. म्हणजे बघा; CBSE शाळा म्हणजे फक्त आणि फक्त अभ्यासाचा मळा! हो की नाही? इथे इतर गोष्टीला वाव नाही आणि भाव ही नाही, असाच एकूण समस्त समजाचा समज. आणि अलीकडे तर वेगवेगळ्या reels आणि जाहिराती टाईप व्हिडिओ मधून इंग्रजी शाळांमध्ये पोरं शिकतात म्हणजे त्यांना व्यवहारज्ञान, समाजभान हे खूपच कमी असते असा एक समज पसरवण्याचा प्रयत्न असतो.

सीबीएसई मध्ये मुलांना अभ्यासच इतका असतो की इतर ॲक्टिविटीमध्ये त्यांना भाग घ्यायला, प्रॅक्टिस करायला, वेळच मिळत नाही, अशीच साधारण तक्रार सगळीकडे असते. मात्र काल सीबीएसई शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला आणि इंग्रजी माध्यम किंवा विशेष करून केंद्रीय अभ्यासक्रम घेतलेल्या शाळा या आपल्या संस्कृती पासून दूर जाताहेत का ? या आणि अशा इतर सगळ्या गैरसमजांना छेद गेला. 

‘अतुल्य भारत’ या एका अद्भुत विषयावर हा सांस्कृतिक महोत्सव बेतला होता. कुठेही कसलाही बटबटीतपणा नाही आणि प्रत्येकाला आपण करत असलेल्या भूमिकेची उत्तम समज आहे, हे ते ज्या पद्धतीने काम करत होते, त्यावरून जाणवत होत. एक छोटंसं उदाहरण देतो, अहो रामायणातील वानरसेना जेंव्हा बाहेर आपल्या नंबरची वाट बघत उभी होती, तेंव्हा ते एकमेकांच्या शेपट्यांना धरून उभे होते म्हणजे बघा😀😀!

मी स्वतः खर सांगायचं, तर फक्त माझ्या मुलीचा परफॉर्मन्स बघून निघायचं असे ठरवून गेलो होतो पण पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत अजिबात उठावे वाटले नाही इतका सुंदर कार्यक्रम झाला.

 सुरुवातीला सादर झालेली गणेश वंदना (ज्यामध्ये आमची कन्या होती😀) पुढील कार्यक्रम कसा असेल याची नांदी देऊन गेली. 

रामायणापासून ते चांद्रयानापर्यंतचा हा प्रवास खूप प्रेक्षणीय आणि श्रवणीय होता. गदिमा यांच्या नावे असणारे हे सभागृह खूप आनंदी झालं असेल, जेंव्हा त्याने या पिटूकल्यांना गीतरामायण यावर सुंदर नाच करताना पाहिलं असेल आणि यात नाविन्यता आणि परिपूर्णता इतकी होती की, प्रत्येक क्षण एखाद्या फोटो सारखा फ्रेम करून ठेवावा असे वाटत होते.

यानंतर महाभारत या विषयावर सादर करण्यात आलेले नृत्य तर एकदम रोमांचकारी होते. एकदम लाजवाब!  आरंभ हे प्रचंड या गाण्यावर मुलांनी जी काही मस्त नृत्य अदाकारी केली! खरंच ती कल्पनातीत अशीच झाली. त्यानंतर झालेले मध्ययुगीन काळातील थीम वर आधारित पंजाबी सुफी आणि वारी हे नृत्याविष्कार तर एवढ्या मोठ्या थिएटर पेक्षाही मोठे वाटावेत असे झाले. शब्द नाहीत त्याला. 

अहो मी इतके दिंडीवरचे कार्यक्रम पाहिले आहेत पण स्टेजवर दिंडी मधला सर्वोच्च क्षण म्हणजे रिंगण पहिल्यांदा पाहिले. काय सुरेख रिंगण केले मुलांनी केवळ अप्रतिम! पण हे असे खूप सांस्कृतिक संस्कारित दाखवत राहिलं, तर वास्तवापासून काल्पनिकतेकडे जाणारा प्रवास वाटला असता. 

कारण काहीही झालं तरी आजची ही किशोर पिढी डान्स नंबर आणि आयटेम साँग अश्यावरच मनमुराद थिरकते. या साठी शाळेने निवडलेली कल्पना तर खूपच अफलातून आणि अनेक शाळांनी अनुकरण करावे अशीच होती. नाचण्यासाठी योग्य असे गाणे निवडायचे, पण त्याचे कनेक्शन एकदम आपल्या उच्च मूल्यांशी लावायचे ही कल्पनाच खूप भन्नाट होती. म्हणजे जय हो हे गाणे नाचायला लावायचे आणि त्याचवेळी आपले सगळे नोबेल विजेते शास्त्रज्ञ आणि भारतरत्न आठवायचे काही भारी कनेक्ट होतो ना. मस्तच!

अगदी अशीच गोष्ट चंद्रावर असणाऱ्या गाण्यांची तेरे वास्ते मैं चांद लाऊंगा असे म्हणताना इस्त्रो आणि चांद्र मोहीम आठवायची कसलं भारी ना हे.

 सगळच स्वतः करायचं की काही आऊट सोर्स करायचं याच योग्य भान आणि ज्ञान या निमित्ताने मुलांना झाले. कारण ही बाहेरची गाणी निवडणे,  नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी मार्गदर्शन घेणे, हे करत असतानाच शाळेच्या स्वतःची ओळख असणाऱ्या बँडने पण खूप सुंदर सादरीकरण केले. यात तबला, बासरी ते पाश्चिमात्य वाद्य जसे पियानो, युकेले, हेही विद्यार्थ्यांनी वाजवून दाखवले. 

असा हा सुंदर कार्यक्रम सहज होत नाही. या मागे असतात अविरत कष्ट , मुलांना शनिवार रविवार सुध्धा सुट्टी ना देता स्वतः सुट्टी न घेता शाळेतील शिक्षक वर्गाने झोकून देऊन काम केले यामुळेच असा सुंदर कार्यक्रम होऊ शकला. प्राचार्या कोरे मॅडम, अनिता दास आणि संपूर्ण सांस्कृतिक संयोजन समितीचे खूप खूप अभिनंदन!

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषद अभियंता रविराज राऊत व ठेकेदारासह सहा जणांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा.. इंदापुरात खळबळ..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषद अभियंता रविराज राऊत व ठेकेदारासह सहा जणांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा.. इंदापुरात खळबळ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group