दौंड : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्याने दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.
केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेऊन तातडीने कांद्याती निर्यात बंदी उठवावी अशी मागणी काँग्रेस, पिपल्स रिपब्लिकन पक्ष व राष्ट्रीय किसान मोर्चाने दौंड तहसीलदारानना निवेदनाद्वारे केली.
दौंडमध्ये आज बुधवार बुधवारी (ता. १६) हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचणीत आणले. सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे, या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, याचा विचार करून सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी यावेळी विविध संघटनांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमित सोनवणे, संजीव आढाव, यादव जाधव, राजू जाधव, काँग्रेसचे हरीश ओझा, अतुल जगदाळे, महेश जगदाळे, विठ्ठल शिपलकर व शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र भागवत, गोरक्ष फुलारी, अशोक मोरे, गोरक्ष बारवकर आदींनीही तहसीलदारांना निवेदन दिले.










