धुळे : महान्यूज लाईव्ह
कंस मामाला ही लाजवेल अशी घटना धुळे शहरातील फिरदों नगर मध्ये घडली आहे. मामा भाच्याच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेत चार वर्षाचा भाचा रडतो म्हणून त्याला चक्क पिंपात बुडवून मारले.
याप्रकरणी पोलिसांनी नुरुल अहमद या मामाला अटक केली असून मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव रस्ता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नुरूल अहमद यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी दुपारी भाचा मोहम्मद हुसेन हा रडू लागला व तो काही केल्या गप्प बसेना, म्हणून डोके दुखायला लागले म्हणून संतापलेल्या मुरूल याने त्याला चक्क पाण्यात टाकून दिले. यात या चार वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. नुरूल अहमदची बहिण व मोहम्मद हुसेन याची आई मरियमबी हुसेन यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.











