दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे रहिवासी कैलास कदम हे २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरूर येथून पुणे सातारा महामार्गावरुन दुचाकीवरुन ओझर्डे येथील आपल्या राहत्या घरी मुलगा वैभव याच्यासह निघाले होते. कवठे गावच्या हद्दीत आले असता त्यांच्या पुढे जात असणाऱ्या एका पिकअप गाडीला त्यांच्या दुचाकीने धडक दिली.
या अपघातात दुचाकीचालक कैलास कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा वैभव हा गंभीर जखमी झाला. त्यास तातडीच्या उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
ओझर्डे येथील कैलास कदम हे ओझर्डे गावचे सुपुत्र व प्रगतीशील शेतकरी होते. कष्टाळू शेतकरी
अशी ओळख असलेल्या कैलास कदम यांचे अपघाती निधन झाल्याने ओझर्डे गावावर शोककळा पसरली.
दरम्यान या अपघाताची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी पोलिस पथक पाठवून मृत कैलाश कदम यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला .











