नगर : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील तुळापूर येथून सुरू झालेली तुळापूर ते नागपूर ही युवा वर्गाच्या अनेक प्रश्नांची उकल करणारी व राज्य सरकारकडे या प्रश्नांची मांडणी करणारी युवा संघर्ष यात्रा मध्यंतरी 28 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर थांबवली होती. ती यात्रा आज जामखेड तालुक्यातील चौंडी येथून सुरू होणार आहे.
कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा सुरू असून ती 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे पोहोचणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये पोचणाऱ्या यात्रेमध्ये युवा वर्गाचे अनेक प्रश्न, त्यांच्या समस्या, बेरोजगारी, युवा धोरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतरही प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे.
ही युवा संघर्ष यात्रा आज चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळापासून सुरू होईल. आज संध्याकाळी चौंडी येथे यात्रेची सुरुवात होईल, तसेच आज संध्याकाळचा मुक्काम हा हळगाव येथे असणार आहे. यानंतर ही यात्रा पुढील 25 दिवसात नागपूर येथे पोहोचणार आहे.











