दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील नामांकित विधीज्ञ ॲड. अझहरुद्दीन मुलाणी यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या बारामती लोकसभा संयोजकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने महाविजय २०२४ अभियानाअंतर्गत सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये अल्पसंख्याक बहुल विभागातील बूथ स्तरावर विविध कार्यक्रम व पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी त्यादृष्टीने लोकसभा क्षेत्रामधील अल्पसंख्याक बहुल विभागात बूथ रचना मोर्चा संघटनात्मक व रचनात्मक कार्यास अधिक गती देण्यास साठी प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा ने प्रत्येक लोकसभा क्षेत्राकरिता अल्पसंख्यांक लोकसभा संयोजक नियुक्त केलेले आहे.
बारामती लोकसभेसाठी दौंड तालुक्यातील मळद येथील ॲड. अझहरुद्दीन मुलाणी यांची संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी काम पाहिले आहे असून, ते दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय समजले जातात.











