जालना : महान्यूज लाईव्ह
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर मागे घेतले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी हे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर काल सर्वपक्षीय आमदार व पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यावेळी देखील जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली होती.
मराठा आरक्षण आणि अन्य मागण्या संदर्भात 2 जानेवारी पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशा संदर्भातील चर्चा या आंतरवाली सराटीतील बैठकीत झाली आणि जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंत शिष्टमंडळ आणि मुदत मागितल्यानंतर सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण मागे घेतले.
जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे आता गावागावात सुरू असलेले उपोषण देखील थांबणार आहे. मात्र यापुढे सरकारला वेळ मिळणार नाही, सरसकट आरक्षण द्यायला सरकार तयार झाले असल्याने त्यांची ही आता ही शेवटचीच वेळ असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट करत हे उपोषण मागे घेतले.











