हिंगोली : महान्यूज लाईव्ह
मी मराठा आरक्षणामुळे जीव देत असल्याची चिठ्ठी लिहून हिंगोलीतील मराठा युवकाने आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील देवजना गावामध्ये कृष्णा कल्याणकर या मराठा युवकाने मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली या आत्महत्येमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतरही मराठा युवक नैराश्यावस्थेत असून ते आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणासाठी हा आणखी एक बळी महाराष्ट्रात गेल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.
हिंगोलीच्या देवजना गावामध्ये आज सकाळी कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.











