अहमदाबाद : महान्यूज लाईव्ह
देशातील सर्वात मोठा चहा विक्रीचा व्यवसाय असलेल्या वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई यांना ब्रेन हेमॅरेजमुळे उपचारासाठी अहमदाबाद मध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पराग देसाई हे 15 ऑक्टोबर रोजी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते त्यांच्या घरामध्ये असलेल्या इस्कॉन मंदिराच्या रस्त्यावर भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या दुर्घटनेत त्यांच्या मेंदूला गंभीर जखम झाली. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे देसाई यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
त्यानंतर तिथून त्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.











