विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासूनच बारामतीतील विविध विकास कामांची अजित पवार यांनी पाहणी केली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार झाला. जनता दरबारात अजितदादांना आपल्या विविध समस्या,अडचणी सांगण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात. नागरिकांचे जे काम, अडचण, समस्या आहे.ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तत्काळ मार्ग त्याच ठिकाणी काढला जातो. हीच तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासियत आहे.











