दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ९ गावांच्या कोतवाल पदांसाठी सरळ भरती होणार असून तब्बल ५९ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या रविवारी (दि १५) दौंड येथे परीक्षा होणार आहे. ही माहिती दौंड तहसीलदार अरुण शेलार व निवासी नायब तहसीलदार ममता भंडारी यांनी दिली.
दौंड तालुक्यातील ९ तलाठी कार्यातील साजाच्या रिक्त असलेल्या महसूल विभागाच्या कोतवाल पदांसाठी काही दिवसापूर्वी आरक्षण सोडत नुसार सरळ भरती करण्याचे आदेश दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी काढले होते. त्यानुसार नऊ गावातील कोतवाल पदांसाठी एकूण ५९ अर्ज आले होते.
या अर्जाची छाननी केल्यानंतर ५९ पैकी पात्र ४३ अर्ज तर १६ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये पारगाव – ४, पाटस- २, गिरीम- ४, बोरीपार्धी – ८, दहिटणे – ३, दौंड – २, बोरीबेल – ९, केडगाव -६, पिंपळगाव – ५ या प्रमाणे एकूण ४३ पात्र अर्ज आहेत.
या पदांसाठी पात्र असलेल्या अर्जदारांची परीक्षा दौंड कला व वाणिज्य महाविद्यालय, गोल राऊंड, दौंड येथे रविवारी ( दि १५) सकाळी १० ते ११ या वेळेत होणार आहे. ५० प्रश्नांसाठी एकूण १०० गुण असणार आहेत. तरी या पदासाठी पात्र असलेल्या अर्जदारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा द्यावी असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.











