• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरवळ ग्रामपंचायतीसमोर भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांची तारांबळ!

tdadmin by tdadmin
October 12, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0
शिरवळ ग्रामपंचायतीसमोर भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांची तारांबळ!

दौलतराव पिसाळ, वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु न झाल्याच्या निषेधार्थ शिरवळ ग्रामपंचायतीसमोर भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्यासह ७ युवकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिरवळ पोलिसांनी तत्परता दाखवत आंदोलकांना ताब्यात घेतले.

याबाबतची घटनास्थळी  भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ (ता.खंडाळा) या ठिकाणी शासनाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत  4 कोटी 72 लाख 83 हजार 667 रुपये किंमतीची जलशुध्दीकरण पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दरम्यान, शिरवळ गावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत शासनाच्या नियमावलीनुसार नवीन योजनेमध्ये 20 दशलक्ष लिटर क्षमतेची जलशुद्धीकरण केंद्रासाठी 10 गुंठे व 1.80 लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीसाठी 2 गुंठे जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याबाबत शिरवळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पाणी टाकीजवळ शिरवळ ग्रामपंचायतीने जागा सूचित केली होती, मात्र खंडाळा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी पाहणीनंतर सदरची जागा ही शासकीय नियमावलीनुसार शिरवळसाठी अपुरी असल्याचे जागेची मोजमापे घेण्यात आल्यानंतर निदर्शनास आले. 

त्यानुसार उपअभियंत्यांनी व कार्यकारी अभियंत्यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अहवाल  येताच संबंधितांशी लेखी व तोंडी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार व पाहणीनुसार शिरवळ येथील शासकीय गट नंबर 944 मधील जागा निश्चित करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले.

 त्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी जनता  फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य कांबळे, इम्रान काझी यांच्यासह युवकांनी केली व खंडाळा पंचायत समितीसमोर घंटानाद करीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु न झाल्यास गुरुवारी १२ ऑक्टोबर रोजी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

 आज गुरुवार (दि.१२ ऑक्टोबर रोजी) शिरवळ ग्रामपंचायतीसमोर शिरवळ पोलीसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, जनता फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य  कांबळे, इम्रान काझी, हितेश जाधव, गणेश पानसरे, गजानन कुडाळकर, केदार हाडके यांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर येत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

  शिरवळ पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेनंतर शिरवळ पोलीस ठाण्यात आमदार जयकुमार गोरे यांनी भेट देत शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी आमदार जयकुमार गोरे पत्रकारांना म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असताना कार्यकर्त्यांना आंदोलनाची वेळ यायला नको होती. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याबरोबर चर्चा करून शिरवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल.

Next Post
सुपे हद्दीतील काऱ्हाटी गावचे हनुमान मंडळ मोरया अवार्डचे मानकरी!

सुपे हद्दीतील काऱ्हाटी गावचे हनुमान मंडळ मोरया अवार्डचे मानकरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group