दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाईत भाजी मंडईत दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. ऐन बाजारच्या दिवशी वाई शहरात मोठी गर्दी असतानाच ही घटना घडल्याने नागरिकांची धावपळी उडाली तसेच परिसरातील या घटनेने खळबळ उडाली.
ही घटना वाई नगरपालिकेजवळ घडली. सोमवारी वाईचा बाजार असतो. बाजारात गर्दी असल्याने शहरातही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अग्नीशमन बंब दाखल झाल्याने आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.











