दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथील युको बॅंकेत साडेबारा हजार रुपये भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातातून हिसकावून एका अज्ञात चोराने चोरी करून धूम ठोकल्याची घटना घडली. ही माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिना राजेंद्र ढोरजकर (वय ५०, रा.निमोणे ता. शिरुर ) या पारगाव येथील भावजय सविता ताकवणे व भाचा वैभव ताकवणे यांच्या सोबत युको बॅंकेत खात्यात पैसे भरण्यासाठी बुधवारी (दि ४) सकाळी गेल्या होत्या.
तिथे एक अनोळखी व्यक्ती आली, अंदाजे ५० ते ५५ वर्षं वयाची व अंगात राखाडी रंगाचा शर्ट, काळया रंगाची पॅन्ट घातलेल्या, शरीराने जाड, रंगाने गोरा या अनोळखी व्यक्तीने ढओरजकर यांच्या हातातील रोख रक्कम १२ हजार ५०० रूपये जबरीने हिसकावली आणि तो मोटारसायकलवर पळुन गेला.
याबाबत मिना ढोरजकर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे अधिक तपास करीत आहेत.











