हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लुमेवाडी च्या विकासासाठी प्रयत्न करणार..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भाजपा युवा मोर्चाचे नेते राजवर्धन पाटील यांनी लुमेवाडी येथील सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करीत दर्शन घेतले.
इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील गाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान आहे. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी या उरुसानिमित्त सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करीत दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
लुमेवाडीच्या उरुसाला मोठ्या संख्येने भाविक येऊन दर्शन घेत असतात. या उरुसाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.











