महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
उनका मरना देखा पुरे जमानेने, एक मोदी सरकार है, जिसे खबर ना हुई` या ओळी काही एखाद्या शायरच्या नाहीत, तर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर चार ओळीची टिका केली आहे, ज्यातून मोदी सरकारने कोरोनाच्या काळात पायी प्रवास करणाऱ्या मजूरांचे मृत्यू मोजले नाहीत, त्यामुळे त्यांची भरपाई देण्याची गरज नाही. या न्यायालयात केलेल्या मतावर गांधी यांनी झोड उठवली आहे.
भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्यानंतर सरकारने लॉकडाऊन केला आणि त्याच काळात लाखो मजूरांनी आपापली स्थलांतरीत राज्ये सोडली व मिळेल त्या वाहनाने आपल्या राज्याकडे प्रवास केला. लाखो मजूरांना वाहनेच मिळाली नाहीत, मग हे मजूर चालत-चालत राज्यामध्ये गेले. या प्रवासादरम्यान, रेल्वेमध्ये, गाड्यांच्या अपघातात देखील अनेक मजूर मारले गेले. मात्र त्यांच्या नुकसानभरपाईची याचिका कोर्टात दाखल केल्यानंतर सरकारने या मजूरांच्या मृत्यूची नोंद नसल्याने त्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा येत नाही अशा प्रकारची माहिती कोर्टात सादर केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
याच पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी तुमने ना गिने, तो क्या मौत नही हुई? हा मगर दुख है सरकार पे असर ना हुई.. उनका मरना देखा पुरे जमानेने, एक मोदी सरकार है, जिसे खबर ना हुई या चार ओळी लिहून मोदी सरकारवर हल्ला चढवला.










