• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूर तालुक्याच्या सुपुत्राला साखर उद्योगातील 28 वर्षाच्या अमूल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार!

Maha News Live by Maha News Live
September 27, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिऐशन’चा ‘जीवन गौरव पुरस्कार’ राजेंद्र चांदगुडे यांना जाहीर! 

पुणे : महान्यूज लाईव्ह

साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक जुनी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे,  उलट अलिकडे तर जो साखरेचे खातो त्याला मधुमेह होतो असे म्हणतात! अर्थात अशाच सातत्याने तीव्र चढउताराचा सामना अनुभवणाऱ्या साखर उद्योगाच्या क्षेत्रात तब्बल 28 वर्ष ज्यांनी सातत्याने योगदान दिले, मार्गदर्शन केले आणि साखर उद्योगाच्या वैविध्यपूर्ण वाटचालीस हातभार लावला, त्या इंदापूर तालुक्यातील तावशी गावचे सुपुत्र राजेंद्र चांदगुडे यांना साखर उद्योगात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिऐशन ऑफ इंडिया ने ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ च्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राजेंद्र चांदगुडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने नुकतेच सन्मानित केले. 

संस्थेच्या ६८ व्या वार्षिक सभेमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष एम. के. पटेल (गुजरात), उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, कार्यकारी सचिव गौरी पवार, व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, एनएसआयचे संचालक नरेंद्र मोहन, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयंत नाईकनवरे आदीं मान्यवर उपस्थित होते.          

राजेंद्र चांदगुडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवीधर यांत्रिक अभियंता, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून साखर अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर या संस्थेतील चार्टर्ड इंजिनियर आणि महाराष्ट्र शासनाचे प्रथम वर्ग बॉयलर अभियंता आहेत.

साखर आणि संबंधित उद्योगाच्या विकासात मागील 28 वर्ष त्यांचे भरीव योगदान लाभले आहे. ते सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांची साखर उद्योगात एक सुप्रसिद्ध अभियंता, संशोधक, लेखक आणि जगभरातील नामांकित साखर कारखान्यात सल्लागार म्हणून वेगळी ओळख आहे.     

चांदगुडे हे साखर कारखान्यांची तांत्रिक कार्यक्षमता आणि क्षमता वापर यात सातत्यानं सुधारणा व्हावी, याबाबत ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या साखर अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन करतात. कारखान्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वीकारून तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत राहावे, अशी त्यांची भूमिका असते.

साखर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तसेच कारखान्यांचे मिल बंद प्रमाण कमी करणे, गाळप हंगाम बंद काळात यंत्र सामग्रीची कार्यक्षम दुरुस्ती आणि चालू हंगामात प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीबाबत ते नेहमी मार्गदर्शन साखर कारखान्यात करतात.

साखर उतारा जास्तीत जास्त कसा राहील, कारखाना चालवताना लागणारी वाफ, पाणी आणि विजेची बचत कशी होईल, याबाबत कोणते तांत्रिक बदल कारावेत, कोणती यंत्रसामग्री वापरावी याबाबतचा सल्ला आणि सेवा देण्याचे काम ते कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन करत असतात.

साखर कारखान्यांना अधिकचे उत्पन्न मिळण्यासाठी भुशावर आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे, उभारणीच्या कामात सल्ला देण्याचे तसेच प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज निर्मिती होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्षम यंत्रसामग्री बसवून ऊर्जा बचत करण्यासाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात.                        

त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध जर्नल्समध्ये ३० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या कौशल्य आणि प्रावीण्यावर आधारित पुस्तक लिहिले आहे. साखर उद्योगात त्यांना अनेक प्रतिष्ठित संस्थेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी अर्जेंटिना, इजिप्त, घाना, इथियोपिया, इराण, झेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, इंडोनेशिया, फिजी बेटे, मॉरिशस, जपान, थायलंड आणि अधिक देशांना संशोधन शोध निबंध सादरीकरण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी भेटी दिल्या आहेत.

‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिऐशन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना सन १९३६ मध्ये झाली. या संस्थेचे २,२०० पेक्षा अधिक सदस्य असून त्यापैकी बरेच सदस्य साखर उद्योगाशी संबंधित आहेत. तसेच ते विविध तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयातील प्रसिद्ध तज्ज्ञ आहेत.

Next Post

इंदापुरात मानेंच्या घरासमोर सुप्रिया सुळेंसाठी मोठा गोतावळा! राष्ट्रवादीचं गणित बिघडवणार? भाजपसाठीही धोक्याची घंटा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group