महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोरोनातून बाहेर पडल्यांनतर सुट्टीचा दिवस असूनही बीग बी अमिताभ बच्चन यांनी रविवारच्या दिवशी ४ मोठे चित्रपट, ३ शॉर्ट फिल्मचे शुटिंग केले. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याची माहिती दिली आहे.
बच्चन यांनी रविवारच्या एकाच दिवसांत केलेल्या कामगिरीचे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून बच्चन यांनी मात्र ज्यावेळी इतर आराम करीत असतील, तोच कामासाठी सर्वात चांगला दिवस असतो असा सल्ला दिला आहे.
७७ वर्षीय महानायक आजही तेवढ्याच स्फूर्तीने काम करताना पाहून कोरोनातून बरे झालेल्यांसाठीही अनुकरणीय असाच धडा देत आहे.











