मुंबई : महान्यूज लाईव्ह
सरकारच्या उत्पन्न आणि एकूण खर्चामधील बाबींवर बोलताना त्यांनी नुकतेच एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करू शकतील असे वक्तव्य राज्य सरकारने केले, त्या व्यक्तव्यावर टीका करताना राष्ट्रवादीचेच आमदार रोहित पवार यांनी, जर असे गृहीत धरले तर एका आमदार, खासदारावर होणाऱ्या शासकीय करोडो रुपयांचा खर्चात हजारो कर्मचारी काम करू शकतील असे वक्तव्य केले आहे.
रोहित पवार यांनी हे ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. रोहित पवार म्हणाले आहेत की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारी च्या एकेका सभेसाठी ८- १० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी असा विचार मात्र शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.











