बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील रागिणी फाऊंडेशच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गौरी -गणपती सणानिमित्त माझी इकोफ्रेंडली गौराई या गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने ९१४६१७७६४५ व ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी.
पर्यावरणपूरक आरास व समाजप्रबोधनपर संदेश असे दोन निकष विचारात घेतले जातील.
स्पर्धकाने व्हिडिओ तयार करताना स्वत ; गौरी आरास ची माहिती द्यावी. गाणी टाकून तयार केलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाहीत.
व्हिडीओ ३ मिनिटांचा तयार करावा. स्पर्धकाने व्हिडिओ तयार करताना मोबाईल आडवा धरावा. व्हिडीओ २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१४६१७७६४५ या क्रमांकावर पाठवावेत.
ही स्पर्धा रागिणी वूमेन्स क्लबच्या सभासदांसाठी विनामूल्य असून प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम 1ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन रागिणी फाऊंडेशन व लीनेस क्लब बारामती यांच्यावतीने करण्यात आले आहे.











