कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटातील आणि एकनाथ शिंदे गटातील नेते एकमेकांवर जहरी टीका करत होते, तशी सुरुवात आता हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली आहे. हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांचा वाद ताजा असतानाच कोल्हापूर मधल्या सभेत धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या शरद पवार यांच्या झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी मधील गद्दारांना कोल्हापुरी पायदान दाखवा असे वक्तव्य हसनमुश्रीपांना उद्देशून केले होते त्यानंतर हसनमुश्रीफ यांनी देखील कोल्हापुरी पायतान बसलं की कळेल असा टोला लगावला होता.
या वक्तव्याचा दाखला घेत कोल्हापूर मधील उत्तरदायित्व सभेत धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून हसन मुश्रीफ यांना मिठी मारली, तर बरगड्या मोडतील, नाद करू नका असा टोला दिला होता. त्यावर आज जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्वीट करताना धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. ते या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत, त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली, तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असे वक्तव्य केले. कदाचित मुंडे यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्र मध्ये कोथळा बाहेर काढला जातो.











