अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करणार : तहसीलदार गिरीश जोशी
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
सध्या विदर्भ मराठवाड्यामध्ये शासनाचे रेती लिलाव बंद असल्याकारणाने अवैधरित्या चोरट्या मार्गांनी रेती वाहतूक होत आहे. लोणारचे तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव तेली येथे अवैधरित्या ट्रॅक्टर मध्ये रेती भरताना एक ट्रॅक्टर पकडला.
हा ट्रॅक्टर जप्त करून लोणार तहसील कार्यालयात जमा केला. या ट्रॅक्टरवर १ लाख २२ हजार रुपयांचा दंड ठरवण्यात आला असून ही कारवाई लोणार तहसीलचे तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडल अधिकारी लक्ष्मण सानप, तलाठी अशोक सौदर, किशोर मादनकर यांनी केली. यापुढे अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा लोणारचे तहसीलदार गिरीश जोशी यांनी दिला आहे.











