पुणे : महान्यूज लाईव्ह
गुन्हेगार गुंगीचे औषध देऊन अत्याचार करतात, ही गोष्ट आता जुनी झाली.. पुण्यामध्ये महिला पोलिसालाच शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन पोलिस शिपायानं बलात्कार केला, शिवाय व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यानंतरही वारंवार अत्याचार केला अशी फिर्याद महिला पोलिसानेच दिली आणि पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
याप्रकरणी पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी दीपक मोघे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सन 2020 ते ऑगस्ट 2023 यादरम्यान खडकवासला व स्वारगेट पोलीस वसाहतीमध्ये हा प्रकार घडल्याचे पोलीस फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस दलात नेमणुकीला असल्याने ओळख झालेल्या दीपक मोघे याने महिला पोलीस कर्मचाऱ्याशी ओळख वाढवली. यादरम्यान कोरोनाचा लॉकडाऊन असल्याने या काळात पीडितेच्या घरी दीपक मोघे हा जेवणासाठी जात असे. याच कालावधीत शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन मोघे आणि पिडितेसोबत शारीरिक संबंध केले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर या व्हिडिओची भिती दाखवत मोघे याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला व पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पिडितेच्या घरातील पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल अशा वस्तू देखील त्याने नेल्या अशी फिर्याद यामध्ये देण्यात आली आहे.











