जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : पुणे सातारा हायवे वेळू ता.भोर,जि.पुणे गावचे हद्दीत सर्विस रोडवर वेश्यागमनास प्रवृत्त करणाऱ्या महिलांवर राजगड पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, वेळू (ता. भोर जिल्हा पुणे) गावच्या हद्दीत पुणे सातारा हायवे रोडच्या बाजूला काही महिलां अश्लील हावभाव हातवारे करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेश्यागमनास प्रवृत्त करून सार्वजनिक ठिकाणी उभ्या असताना मिळून आल्या.
या महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार राजगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, याची फिर्याद भगीरथ घुले यांनी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घुले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. खरात करीत आहेत.











