महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राज्यपालांनी नशेबाज कंगना रानावतची भेट घेतली, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल आणि भक्त सर्वजण त्याचे समर्थन करीत आहेत, चोर, गुन्हेगार, भ्रष्टाचारी यांचे सर्वांचे स्वागत आहे, फक्त ते भाजप समर्थक पाहिजेत अशी टिका कॉंग्रेसचे नेते उदीत राज यांनी केली आहे.
मुंबईतून निघण्यापूर्वी कंगना राणावत हीने आणखी एक शो केला. तिने राज्यपालांची भेट घेतली. मात्र खरेतर ही भेट जणू राज्यपालांनीच घेतल्यासारखी भासली. ती राजभवनात आली, तेव्हा राज्यपाल तिची वाट पाहत बसले होते. ती आली, त्याबरोबर राज्यपाल उठले, त्यांनी नमस्कार केला. तिने राज्यपालांना नमस्कार केला. ती बसली आणि त्यानंतर काही वेळाने राज्यपाल बसले. एवढा पचका केल्यानंतरही भाजप समर्थक कंगनाच्या भेटीचे समर्थन करीत होते, म्हणून कॉंग्रेसचे नेते उदीत राज यांनी टिका केली.
कंगना राणावत राज्यपालांना भेटली की राज्यपालच कंगनाला भेटले? व्हिडिओ येथे पाहू शकता किंवा महान्युज लाइव्हच्या फेसबुक पेजवरही पाहू शकता
दरम्यान कंगनाने राज्यपाल हे येथील पालक आहेत, त्यांनी एखाद्या मुलीची तक्रार जाणून घ्यावी, तसा माझ्यावरचा अन्याय जाणून घेतला. एक सामान्य नागरिक म्हणून मी राज्यपालांना भेटण्यासाठी आले होते असे स्पष्ट केले.










