बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या रागिणी फौंडेशनमार्फत महिलांसाठी अनेक उपक्रम सुरु करण्यात आलेले आहे. रागिणी वूमेन्स क्लब, स्मार्ट गर्ल अभियान यासारख्या उपक्रमांसोबतच आता बारामती एज्युकेशनल हब आणि महिला व्यावसायिक मार्गदर्शिका तयार करण्याचा उपक्रम फौंडेशनकडून हाती घेण्यात आलेला आहे. त्यासाठी प्रतिनिधी नेमण्यासाठीच्या मुलाखती उद्या ( रविवारी ) होत आहेत.
बारामतीत शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभे राहिले आहे. राज्यातून आणि देशातून बारामतीत विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. येथे येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांना अगदी स्टेशनरी दुकानांपासून, होस्टेल, मेस, विविध विषयांसाठी क्लासेस अशा अनेक लहानमोठ्या गोष्टींची माहिती गरजेची असते. ही माहिती या मार्गदर्शिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याखेरीज बारामती शहरातील महिला व्यावसायिकांचीही माहिती या मार्गदर्शिकेत दिली जाणार आहे.
या प्रकल्पात काम करण्यासाठी इच्छुक प्रतिनिधींच्या मुलाखती उद्या दि. ३ सप्टेंबर रोजी रविवारी स.१० ते १२ या वेळेत पंचायत समिती चौकाजवळील मल्हार क्लब येथे घेण्यात येणार आहे. यासाठी चांगल्या पद्धतीने मानधनही दिले जाणार आहे. बारामती शहरासाठी अत्यंत उपयोगी असणाऱ्या या प्रकल्पात काम करण्याची ही सुवर्णसंधी कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच महिलांनी जरूर घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ९८८१०९८१३८ किंवा ९१४६१७७६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.











