• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यशोगाथा बारामतीच्या सुपुत्राची; भूम तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी आखलेल्या पॅटर्नची!

Maha News Live by Maha News Live
September 14, 2020
in शेती शिवार, मराठवाडा, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
यशोगाथा बारामतीच्या सुपुत्राची; भूम तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी आखलेल्या पॅटर्नची!

बारामती : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्याचे सुपुत्र व काश्मिरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी डोडा जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या पॅटर्नची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत त्यांच्या कामाचा गौरव केला होता. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात तहसीलदार असलेले बारामती तालुक्यातील ढेकळवाडीचे सुपूत्र डॉ. तुषार दादासाहेब बोरकर यांनीही अशीच भन्नाट कामगिरी केली आहे. गावागावात दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या रॅपीड टेस्ट कॅम्पचा या तालुक्यात मोठा फायदा झाला.

तरुण अधिकारी नक्कीच भन्नाट कामगिरी करतात. भूम तालुक्यात योगायोगाने सारे अधिकारी तरूण असल्याने त्यांची जुळलेली विचारधारा या तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी कमालीची उपयोगी पडली आहे. डॉ. तुषार बोरकर यांचा समन्वय साधण्याचा स्वभाव, उत्तम संघटनकौशल्य आणि प्रशासकीय कामकाजावरील पकड यामुळे तालुक्यात सामूहिक यशस्वी कामगिरी साधत त्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


अनेक प्रगत तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भूम तालुक्यात आठ महिन्यात कोरोनाचे ६२२ रुग्ण आढळले असून त्यापैकी तब्बल ५०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या तालुक्यात अॅक्टीव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या ९९ आहे. तर कोरोनावरील उपचारादरम्यान मृत झालेल्यांची संख्या १४ एवढी आहे.


कोरोनाची महामारी थोडी संधी मिळाली की, उच्छाद मांडते आहे, हे सर्वजणच अनुभवत आहेत. अगदी पहायला गेल्यास बारामती, इंदापूरसारख्या तालुक्यांमध्ये दोन दोन वेळा लॉकडाऊन करावे लागले आहे. त्यामुळे कोरोनाला थोडी संधी मिळाली की, कोरोना फैलावतो हे साऱ्यांनीच अनुभवले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्याचा एक आराखडा केला. यामध्ये कोरोना रोखण्यासाठी आक्रमक उपाययोजना सुरवातीपासूनच राबविण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर भूम तालुक्यात प्रांताधिकारी मनिषा राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. गटविकास अधिकारी राजू कांबळे, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिनगारे यांच्यासमवेत त्यांनी गावांची, महत्वाच्या ठिकाणची पाहणी केली.

काय होते मॉडेल?

सुरवातीस ग्रामीण भागात गावनिहाय, गल्लीनिहाय, शहर व गल्ल्यांनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जे सहव्याधीग्रस्त (म्हणजे मधुमेह, अस्थमा, रक्तदाब, कर्करोग, एचआयव्ही) रुग्णांची संख्या निश्चिती केली. त्यांची यादी बनवून त्यांना चाचणी सक्तीची केली. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या याद्या तयार केल्या. त्यानुसार हॉटस्पॉट शोधून तेथे रॅपीड टेस्ट कॅम्प घेतले. रुग्णांनी त्यांच्या गरजेनुसार दवाखान्यात येण्यापेक्षा तेथे पोचून अॅक्टिव्ह सर्वे करून रुग्णांपर्यंत पोचून त्यांना शोधण्याची शिकस्त मग शासकीय पथकांनी केली. त्यानंतर इतर गावे, शहरांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण नसलेल्या ठिकाणीही व्यावसायिक, विक्रेते, थेट संपर्क येणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी नगरपरीषदेत रॅपीड टेस्ट कॅम्प घेतले. त्याचा परिणाम दिसून आला. आज येथील शासकीय यंत्रणेवर मोठा ताण नाही. त्याला कारण येथील शासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केल्या आणि नागरिकांना आश्वस्त केले. कोरोनाची भीती नाही, तर दक्षता घेण्यासाठी शिक्षित केले. योग्य जनजागृती हे देखील त्यांच्या या उपाययोजनेचे वैशिष्ठ्य ठरले. कोणत्याही परिस्थितीत गावशिवारातील माणूस कोरोनाची अनाठायी भीती घेणार नाही, दक्षता घेईल यासाठीचे वातावरण त्यांनी तयार केले.


डॉ. तुषार बोरकर, तहसीलदार भूम (जि. उस्मानाबाद) – खरे म्हणजे या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यांमध्ये ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यात वेगळे काही नाही. मात्र कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना महत्वाच्या ठरल्या. लोकांना दिलासा मिळाला. वरिष्ठांचे मार्गदर्शन, शासकीय यंत्रणा, राजकीय प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न व सामान्य जनतेने त्याला दिलेला उत्तम प्रतिसाद यांचे हे सामूहिक यश आहे. विशेष म्हणजे तालुक्यात एक पोलिस एक गणपती अशी घोषणा केली, तर सर्व गावांनी, मंडळांनी त्यास प्रतिसाद देत गणेशोत्सवही अशाच प्रकारे साजरा केला.

Next Post
तर गाडीखालची कुत्रीही जोरात भुंकतील…

तर गाडीखालची कुत्रीही जोरात भुंकतील...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group