राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने साखर आयुक्तांनी त्यांना जप्तीची नोटीस बजावली आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आमदार राहुल कुल आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
दौंड तालुक्यातील निराणी ग्रुपच्या ताब्यात असलेल्या श्री. साईप्रिया शुगर्स प्रा. लि. तथा भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीची तब्बल ५ कोटी ७८ लाख रुपये थकवल्यामुळे राज्य साखर आयुक्तांनी कारखान्याला नुकतीच जप्तीचे आदेश दिले आहेत. साखर आयुक्तांनी बजवलेल्या या नोटीशीचे भीमा पाटस सहकार बचाव कृती समितीचे नामदेव ताकवणे तसेच तालुक्यातील सर्व सामान्य ऊस उत्पादक सभासदांनी स्वागत केले आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ट्विटरवर आणि फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य साखर आयुक्तांनी भीमा पाटस कारखान्याला बजावली जप्तीची आदेश शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय! प्रश्न इतकाच आहे आमदार राहुल कुल यांना वाचवण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने विधानसभेत आमदार कूल यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. सरकार खोटे बोलले व आता तोंडावर पडले. राहुल कुल यांनी ५०० कोटींचे मनी लॉंड्रींग केले आहे. ते सिद्ध होईलच अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.











