विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : आज शरद पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे.कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार आमचे नेते आहेत. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देशपातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला, म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.











