बारामती – माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. निळकंठ ढोणे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवपदी निवड झाली आहे.
प्रा. डॉ. ढोणे हे शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असतात. बारामतीत गेली अनेक वर्षे आयोजित होणाऱ्या रमाई व्याख्यानमालेतही ते सक्रीय सहभागी असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये त्यांचे अनेक संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत.











