सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धरण,नदी किनारी जाताय तर सावधान!
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर: सलग सुट्ट्या असल्या कारणाने पर्यटक नदी किनारी किंव्हा धरण परिसरात फिरण्यासाठी जात आहेत आणि आपला पोहण्याचा मोह आवर न घालता धरणाच्या व नदीच्या पात्रात उतरून आनंद घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु भोर,वेल्हा, मुळशी तालुक्यातील या घटनांमुळे आपल्या आनंदावर विरजण पडलेले नक्कीच जाणवेल. भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या स्वतंत्रता दिणा दिवशीच चार पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला आहे.
भोर : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड-पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता.भोर) येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील मुलगी ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी व तिचे वडील शिरीष धर्माधिकारी बुडाले, त्यापैकी मुलगी सुरवातीला सापडली, मात्र या घटनेत तिचा मृत्यू झाला. वडीलांचा मृतदेह आज सापडला.
वेल्हा : किल्ले राजगड (ता. वेल्हे) येथील पद्मावती पाण्याच्या टाक्यात पडून भिवंडी (ठाणे) येथील अजय मोहनन कल्लामपारा (वय.३३) रा. भिवंडी, ठाणे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करीत होता. मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
मुळशी : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या हर्षित पोटलुरी (वय-27) असे मृत्यू झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मंगळवारी (दि.15 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे मुळशी गावच्या हद्दीत घडली आहे.
भोर, वेल्हा मुळशी तालुक्यातील या घटना समोर आल्या असुन चारही मृतदेह मिळाले. भोर तालुक्यातील भाटघर धरणातील गिरीश धर्माधिकारी हे बेपत्ता होते. पर्यटन करताना पर्यटकांनी काळजी घेणे अपेक्षित असते, पण काही कारणाने मोह आवरत नसल्यामुळे आपल्या जीवाला मुकावे लागत असल्याचे देखील या घटनांतून समजून येत असून, एकच दिवसात वेगवेगळ्या तालुक्यात ४ मृत्यू ते देखील धरण परिसरात या मुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेतात, पण काळजी घ्या हे देखील महत्त्वाचे आहे.