बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाच्या लढ्यात गावपातळीवर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पिंपळी (ता. बारामती) येथील पी.एम.डी. फूड्स डेअरी मिल्क कंपनीने आरोग्याच्या सुविधा देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने येथे प्रशासक काम पहात आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोनाचा सर्व्हे करताना कर्मचारी यांना अडचणी जाणवत होत्या. सध्या गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने घरोघरी जाऊन सर्व्हे करणे गरजेचे होते. परंतु उपयुक्त साधन सामुग्री तातडीने उपलब्ध होत नव्हती.
ही बाब समजताच येथील पी.एम.डी. डेअरी फूड वर्क्स यांनी ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे ठरविले व गावात सर्व्हे करणारे आरोग्य सेवक,आशा वर्कर, शिक्षक आदींना सॅनिटायझर, मास्क, फेशशिल्ड, पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गण(स्कॅनर), हॅन्डग्लोज आदी सुरक्षतेच्या साधनांचे आज (ता.११) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे वाटप केले.
यावेळी पी.एम.डी फूड्स डेअरी मिल्क चे प्रमुख हनुमंत मोहिते, छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, कर्मचारी अभिषेक माने, राहूल ढमे व पिंपळी ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक ए.जी.सय्यद वैद्यकीय अधिकारी डॉ.निलम पवार, आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नपिसा तांबोळी, बनकर, सोपान थोरात, मल्हारी खोमणे, बापू केसकर आदी उपस्थित होते.










