महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एका पिक्चरने कोणी स्वतःला राणी लक्ष्मीबाई समजत असेल तर त्या न्यायाने ऋतीक रोशनने स्वतःला अकबर, अजय देवगणने भगतसिंह, शाहरूख खानने सम्राट असोक, अमीर खानने मंगल पांडे असेच स्वतःला समजायला हवे अशा शब्दांत जयकांत शिखरे अर्थात चित्रपट अभिनेते प्रकाशराज यांनी कंगना राणावतची खिल्ली उडवली आहे.
प्रकाशराज हे सरकारविरोधी वक्तव्यांबद्दल ओळखले जातात. त्यांनी आज इन्स्टाग्रामवर पोस्ट केली असून त्यामध्ये विवेक ओबेराय, दिपीका पदुकोन, ऋतीक रोशन, अजय देवगण, अमीरखान यांची छायाचित्रे त्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक पात्रांच्या रुपात पोस्ट करून वरील बाजूस कंगनाचे छायाचित्र अपलोड केले आहे.
यामध्ये वरीलप्रमाणे त्यांनी टिका केली आहे. हे छायाचित्र सध्या सोशल मिडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.










