सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केलेल्या मालोजीराजेंच्या गढीवरील पुरातन काळातील चिंचेच्या झाडावरील शेकडो परदेशी चित्रबलाक पक्षी मृत्यूमुखी पडले. त्या पक्षांच्या दुःखात सामील होत आज मृत्युमुखी पडलेल्या चित्रबलाक पक्षांना सावडले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकारांना दिली.
चित्रबलाक पक्षांची बेजबाबदारपणे जेथे हत्या झाली, त्याच ठिकाणी सकाळी दहा वाजता सावडण्याचा विधी होणार आहे, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने हा सावडण्याचा विधी होणार असल्याचे इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने म्हटले आहे.