महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला कंगनाला महागात पडणार आहे.
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील वाकयुध्द क्षमण्याचे कोणतीही चिन्ह नाहीत. आता मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या कंगनाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
कंगना ट्विटरवर संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधत आहे. कंगना काल मुंबईत दाखल झाली. मात्र त्याआधी मुंबई महापालिकेच्या तिच्या अनाधिकृत कार्यालयावर हातोडा चालवला. यामुळे भडकलेल्या कंगनाने पातळी सोडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. आज घर टुटा है, कल तेरा घमेंड टुटेगा असं वाक्य तिनं वापरलं होतं. मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या कंगनाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
ही तक्रार मुंबईतील विक्रोळी पोलिसठाण्यात नोंदविण्यात आली आहे. वकील नितीन माने यांनी तक्रार नोंदवली असून कंगनाला न्यायालयात खेचण्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे या प्रकरणाशी काहीही देणघेणे नसून कंगनाने त्यांचे नाव घेतले. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत असे शब्द वापरणे योग्य नाही.










