मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज त्यांच्या लोक माझे सांगाती आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अचानक आपण पद सोडणार असल्याचे जाहीर केले आणि संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे आमदार नेते व पदाधिकारी शरद पवार यांची मनधरणी करत असतानाच दुसरीकडे संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले.
राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांना निर्णयात फेरबदल करण्याची व निर्णय मागे घेण्याची मनधरणी करत असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे यामध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला दिला आहे.
ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, एक वेळ अशी आली, घाणेरडे राजकारण, आरोप प्रत्यारोप, उबग आला राजकारणाचा.. त्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी देखील तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला शरद पवार तर हे देशाच्या राजकारण आणि समाजकारणाचे श्वास आहेत.