बारामती: महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात आज शासकीय व खाजगी प्रयोगशाळेत तपासलेल्या कोरोना नमुन्यांपैकी आज सकाळपर्यंत तब्बल 84 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बारामती तालुक्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून कोरणा बळींची संख्या 45 वर पोहोचले आहे. तर पुण्यामध्ये उपचार घेत असलेल्या बारामती तालुक्यातील एका सहकारी संस्थेच्या संचालकाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज आढळून आलेल्या व काल तपासणी झालेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील 40 वर्षीय महिला, 55 वर्षे महिला, 70 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगा, 66 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
कन्हेरी येथील 40 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 22 वर्षीय युवक, 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. वाणेवाडी येथे 58 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथे 25 वर्षीय युवक, सोनकसवाडी येथे 50 वर्षीय महिला व 22 वर्षीय महिला रुग्ण आढळून आले आहेत.
गुणवडी येथे तीस वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय मुलगी, सिद्धेश्वर गल्ली येथे 65 वर्षीय महिला, तक्षशिला नगर येथे 21 वर्षीय युवक रूग्णाचा समावेश आहे.
मळद येथे 55 वर्षीय महिला, कोळोली येथे 53 वर्षीय पुरुष व 62 वर्षीय पुरुष, बारामती शहरात 4 वर्षीय मुलगी व 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
चौधरवाडी येथे 13 वर्षीय पुरुष, शिरवली येथे 50 वर्षीय महिला, होळ आठ फाटा येथे 17 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
निंबुत येथे 39 वर्षीय महिला व 68 वर्षे पुरुष, तांबेनगर येथे 51 वर्षीय पुरुष व वाडेकर इस्टेट येथे 26 वर्षीय महिला रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामती मध्ये झालेल्या खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी मध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोहिनूर पार्क भिगवण रोड येथील दहा वर्षीय मुलगी व 37 वर्षीय महिला, अनंत आशानगर येथील 34 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
विश्वासनगर गुणवडी रोड येथील 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय महिला, सर्वोदय नगर आमराई येथील 34 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी एलाईट जळोची रोड येथील सहा वर्षे मुलगी, सूर्यनगरी येथील 44 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथील 47 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
अंबर्डैकर हॉस्पिटल समोर 70 वर्षीय महिला, देशपांडे हॉस्पिटल समोर 25 वर्षीय पुरुष, कसबा येथे 12 वर्षीय मुलगी, कवी मोरोपंत सोसायटी 23 वर्षीय युवक, युनिक रेसिडेन्सी भिगवण रोड येथे 29 वर्षीय महिला, समर्थ नगर गुणवडी रोड येथे 42 वर्षीय पुरुष, वसंतनगर येथे 53 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड येथे 36 वर्षीय पुरुष, उत्कर्ष आयकॉन माळेगाव रोड येथे तीस वर्षीय महिला, विजयश्री विद्या नगर येथे 23 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
याखेरीज शासकीय एंटीजेन तपासणीमध्ये 20 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.











